Vidnyanvahini
 


असे कां आणि कसे?

“असे कां आणि कसे?” हे दोन प्रश्न अगदी लहानपणापासूनच आपल्या मनात सतत रूंजी घालत असतात. आपण त्यांचा पाठपुरावा करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला की अनेक संकल्पना आपल्याला उलगडत जातात. वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. हाच खरा विज्ञान विषयाचा अभ्यास!

 

कार्य आणि ऊर्जा


9 Nov 2021

एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता जर त्या वस्तूचे काही विस्थापन घडून येत असेल तर कार्य झाले असे म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. वस्तूचे विस्थापन कधी बलाच्या दिशेने तर कधी बलाच्या विरुद्ध दिशेने होते. काही वेळा तर बल प्रयुक्त करून सुद्धा वस्तूचे विस्थापन होत नाही.



 

घनता व प्लावक बल


4 Oct 2021

मुलांनो, आपण पदार्थाची (किंवा वस्तूची) घनता म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊया.

समजा आपण एखादा लाकडी ठोकळा घेतला, तो काट्यावर तोलला तर त्याचे वस्तुमान (mass) किती आहे ते आपल्याला कळेल. आणि ह्या ठोकळ्याच्या एकूण आकाराचे मोजमाप केले तर त्याचे आकारमान (volume) किती आहे ते आपल्याला काढता येईल. ह्या दोन गोष्टींवरून ठोकळ्याची घनता तुम्हाला काढता येते, होय ना? वस्तूचे ’वस्तुमान / आकारमान’ ह्याला वस्तूची घनता म्हणतात.



 

न्यूटनचे गतीविषयक नियम - उजळणी


23 June 2021

आज आपण हालचाल-गतीमानता - motion या नैसर्गिक घटिताचा (phenomenon) अभ्यास करणार आहोत. यासाठी आपल्याला उपजतपणेच (intuitively) माहिती असलेल्या काही संकल्पनांचा वापर करणार आहोत. या संकल्पना आपल्याला जुजबीरित्या (roughly) माहिती आहेत. त्यांची नेमकी मांडणी यथायोग्य वेळेला होईल.



 

विद्युतधारेचे परिणाम व उपयोग


5 June 2021

तुम्ही आमचा यापूर्वीचा “विद्युत - काही संकल्पना” हा लेख वाचला असेलच. तसेच तुम्ही ओह्मच्या नियमाचा Video सुद्धा बघितला असेल. त्यामध्ये आपण विद्युतभार, विद्युतप्रवाह (विद्युतधारा) इत्यादी संकल्पना बघितल्या होत्या. विद्युतधारा म्हणजे वाहकातून (परिपथातून) खो खो देत वाहणारे इलेक्ट्रॉन्स, जे जास्त विभवाकडून कमी विभवाकडे वाहतात. हा विद्युतप्रवाह म्हणजेच Current (I) आणि त्याचे एकक अँपीयर असते. विभवांतर म्हणजे व्होल्टेज (V) हे आपण बघितले आहे. त्याचबरोबर ओह्मच्या नियमानुसार V = IR, ह्यात R हा विद्युतप्रवाहाला विरोध करणारा अडथळा असतो. अशा अडथळ्याला रोध (Resistance) म्हणतात. हा अडथळा करणाऱ्या वस्तूला रोधक (Resistor) म्हणतात. मात्र रोधकाला नेहमीच्या व्यवहारात रोध असेही म्हणले जाते.



 

न्यूटनचे गतीविषयक नियम


15 February 2021

मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की, मागील कित्येक शतकांपासून माणूस आपल्या अवतीभोवतीचं जग पहात आला आहे, आजूबाजूच्या साध्यासुध्या हालचालींपासून ते इतर सर्व प्रकारच्या हालचाली न्याहाळत आला आहे. आपणही आजपर्यंत तसंच करत आलो आहोत, म्हणजे नुसतंच बघत आलो आहोत. पण ह्या लेखातून तुम्हाला हे कळेल की, ज्यांच्या मनात ह्या साध्या वाटणाऱ्या हालचालींबद्दल कुतुहल निर्माण होतं, ते त्यासाठी ’असे का व कसे’ ह्या प्रश्नांचा वर्षानुवर्षे पिच्छा पुरवतात आणि अथक अभ्यासाने व प्रयोगांनी उत्तरे शोधून काढतात. पर्यायाने जगाला ज्ञान देतात आणि प्रगतीच्या मार्गावर नेतात. अशांपैकीच आहेत गॅलिलीओ, सर आयझॅक न्यूटन असे शास्त्रज्ञ. आपण ज्यांना ’न्यूटन’ म्हणून ओळखतो, त्यांनी इ.स. 1687 साली त्यांचे गतीविषयक तीन नियम जगाला दिले. 



 

ओहमचा नियम


28 November 2020

तुम्ही ह्यावर्षी विद्युतचा एक महत्वाचा प्रयोग, विद्युतचा पायाच म्हणाना, पुस्तकात वाचलाच असेल. पण तो प्रयोग करून पहाण्याचं किती आणि काय महत्व आहे, हे माहीत आहे का तुम्हाला? असं म्हणतात ना, 'कुठलीही गोष्ट आपण स्वत:च्या हाताने करून पाहिली की ती आपल्याला चांगली कळते.' आणि ह्याचा अनुभव नक्कीच येईल तुम्हाला हा प्रयोग केल्यावर!



 

विद्युत – काही संकल्पना


18 November 2020

असं म्हटलं जातं कीं भौतिकशास्त्र हे उर्जेसंबंधीचं शास्त्र आहे. Physics is a ‘Science of Energy’. खरं आहे. तुम्हाला कोणकोणत्या उर्जा किंवा उर्जेचे प्रकार माहित आहेत?



 

गुरुत्वाकर्षण


15 August 2020

नमस्कार मुलांनो, तुम्हाला माहितच आहे की आपल्या पृथ्वीवरील सर्व नद्या जमिनीवरूनच वाहतात. समुद्राचे पाणी जमिनीवरच असते. पृथ्वीच्या भोवती कायम वातावरण असते. आपण तोंड वर करून पाणी ओतून पिऊ शकतो. पृथ्वी सूर्याभोवती तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. अशा आणखी कितीतरी गोष्टी! पण असं का बरं होत असेल? जरा विचार करूया. येतंय का लक्षात ह्यामागचं कारण?

 

धातू व अधातूचे रासायनिक गुणधर्म


19 Sept 2021

आपण धातू व अधातूंचे भौतिक गुणधर्म बघितले. आता आपण रासायनिक गुणधर्म बघूया. धातू इलेक्ट्रॉन देणारे असतात. धातूंची इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा देण्याची क्षमता जेवढी अधिक, तेवढा धातूगुण अधिक. अति क्रियाशील धातूपासून अक्रियाशील धातूपर्यंत धातूंच्या क्रियाशीलतेत तफावत आढळते क्रियाशीलते प्रमाणे धातूंची क्रमवारी लावली आहे. त्याला धातूंची क्रियाशीलता श्रेणी म्हणतात.



 

धातू व अधातू


5 Sept 2021

वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा शोध लागत गेला तसे त्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक बनले. अगदी पहिल्या वर्गीकरणामध्ये मूलद्रव्यांची विभागणी धातू आणि अधातू अशी केली गेली. अजूनही हे वर्गीकरण आवर्तसारणीत ठळकपणे दिसते. 92 नैसर्गिक मूलद्रव्यांमध्ये 70 मूलद्रव्ये धातूंची आहेत.



 

मूलद्रव्यांची आवर्तसारणी (भाग - 2)


13 May 2021

आधीच्या भागात आपण बघितले की आता मूलद्रव्यांची मांडणी त्याचा अणुअंक आधारभूत धरून केली आहे. त्यामुळे ती अणूच्या इलेक्ट्रॉन संरुपणावर सुद्धा आधारलेली आहे.

सर्व 118 मूलद्रव्यांचे संरूपण लिहिल्यावर मूलद्रव्यांतील अणूंचे अणुअंक, इलेक्ट्रॉन संरूपण व रासायनिक गुणधर्म यांचा विचार करून पुढील मांडणी तयार होते. हीच ‘मूलद्रव्यांची आधुनिक आवर्तसारणी’.



 

मूलद्रव्यांची आवर्तसारणी (भाग - 1)


28 April 2021

मुलांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला नजर टाकलीत तर काय दिसते? खूप वेगवेगळ्या गोष्टी, नाही का? त्याची यादी करता येईल का? मला तर वेगवेगळी झाडे, काही पक्षी, प्राणी, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत. घरात सुद्धा लाकडी फर्निचर, काही लोखंडी वस्तू, तांब्या-पितळेची, स्टीलची भांडी, काचेचे ग्लास, कप दिसतात. तुमची यादी वेगळी आणि मोठी सुद्धा असू शकेल. या सर्व वस्तूंमध्ये (शास्त्रीय भाषेत द्रव्यांमध्ये) किती विविधता आहे ना? यातील काही वस्तू सजीव आहेत तर काही निर्जीव, काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित, काही स्थायूरूपात काही द्रवरूपात तर काही वायुरूपात. ही आपल्या अभ्यासाची सुरुवात. निरीक्षण करणे. आता हे निरीक्षण केल्यावर अभ्यासाचा पुढचा टप्पा.



 

अणू संरचना (भाग - 2)


8 January 2021

आमची खात्री आहे की तुम्ही ‘अणुसंरचना - भाग -१’ नक्कीच वाचला असेल.

इ.स. पूर्वी ५०० वर्षांपासून ते अगदी इ.स. १९१३, म्हणजे बोरने सांगितलेल्या अणूच्या या रचनेपर्यंत (Atomic Structure), काही शास्त्रज्ञानीं केवळ तर्क करून (Logical Thinking) परंतु नंतर अनेकांनी प्रयोगात्मक अभ्यास करून (Experimental Study) अणूंच्या वेगवेगळ्या प्रतिकृती मांडल्या. महत्वाचे म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन म्हणजेच, ‘ तर्क, कारणमीमांसा व प्रायोगिक पुरावा (Logic, reasoning and experimental proof) याचा आधार घेऊन निर्णयाप्रत येणे ’ ही पद्धत अंगिकारून त्याचा मागोवा घेतला. आता आपला नवीन भाग सुरु करताना आपल्या नाटकातील बोर (बोहर ) च्या रंगमंचावरील प्रवेशानंतरचा थोडा भाग, सिनेमातल्यासारखा ‘ फ्लॅश बॅक ’ पाहणं उचित ठरेल. जसं टी. व्ही. वरील सीरियलमध्ये प्रत्येक नवीन भाग सुरु करताना ‘ Recap ’ दाखवतात ना, तसंच. म्हणजे संदर्भ लागायला सोपं जातं.



 

अणू संरचना (भाग - 1)


25 December 2020

आपल्या मानवी शरीराचे कार्य कसे चालते त्याचे बरेचसे बारकावे आपल्याला माहित झाले आहेत. शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींनी बनले आहे परंतु DNA त्यातील महत्वाची भूमिका पार पाडत असतो. तसेच आपले हे सुंदर, विविधतेने व वैचित्र्याने नटलेले परंतु काही विशिष्ट नियमाने चालणारे विश्व केव्हा व कसे निर्माण झाले याचे कुतुहल मानवी मनाला नेहमीच सतावत आले आहे. त्याचे मूळ विविध मूलद्रव्ये व त्यातील अणूरेणू यातच आहे असे म्हणायला शंका राहिली नाही. अणू हाच जणू या सर्वांचा DNA आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही!



 

द्रव्याचे स्वरूप (भाग 2)


4 November 2020

बाबा, द्रव्याचे दोन प्रकाराने वर्गीकरण करतात. भौतिक स्थितीवर आधारीत वर्गीकरणानुसार द्रव्याचे स्थायू, द्रव, वायू हे तीन प्रकार पडतात. त्यांची माहिती द्रव्याचे स्वरूप भाग १ मध्ये तुम्ही मला दिलीत. आता द्रव्याचे, दुसऱ्या प्रकाराने पडणाऱ्या प्रकारांची माहिती देता कां?



 

द्रव्याचे स्वरूप (भाग 1)


28 October 2020

"अरे संजू, काय मस्त वास सुटला आहे रे उदबत्तीचा! अरे काय रे, किती हा पसारा घालून ठेवला आहेस खोलीभर! किती वस्तू जमवल्या आहेस आणि वजन काटा का घेतलायस? काय करतोस काय?"

"बाबा, मी द्रव्याचा अभ्यास करतोय. जरा मी प्रयोग करून बघतोय. आम्हाला आमच्या टीचर नेहमी सांगतात की, प्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही विज्ञान शिकलात तर ते तुम्हाला लवकर समजतं."



 

ओळख रसायनशास्त्राची


9 September 2020

'रसायनशास्त्र' असं भारदस्त नाव घेतलं की तुमच्या डोळ्यासमोर प्रयोगशाळा व त्यात पांढरा कोट घालून काहीतरी करण्यात दंग असलेली माणसं असं येतं का? आपला रोजचा रसायनांशी व त्याच्या शास्त्राशीही संबंध येत असतो. तुमची ओळख याच्याशी आहेच. आता दोस्ती करायचीय.

 

सजीवांच्या पोषण पद्धती


20 August 2021

आपल्या अवतीभोवती अनेक सजीव आहेत. सगळे सजीव सूक्ष्म पेशींनी बनलेले असतात हे आपल्याला माहीत आहे. या पेशींची सतत झीज होत असते. स्वतःचा जीव जगवणे ही सर्व सजीवांची अंत:प्रेरणा असते. त्यासाठी ही झीज भरून निघणे गरजेचे असते. यासाठी हवा, पाणी, अन्न यांची गरज असते.


 

आपत्ती व्यवस्थापन


1 August 2021

आपल्याला त्रासदायक अशा घटना अचानक आकस्मिकपणे घडल्या तर आपण त्याला काय म्हणतो मुलांनो, याचे उत्तर द्याल का तुम्ही? बघा हं! विचारपूर्वक बोला. हा बरोब्बर. कुणी सांगितलं? उत्तर आहे. – “संकट”! ही संकटे कधी सांगून येत नाहीत. तसेच ती भयंकरच असतात, धोकादायक असतात. ती अचानकपणे ओढवतात, म्हणून त्यांना आपण आपत्ती असे म्हणतो.


 

पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान


14 July 2021

मुलांनो आपण सभोवताली बघतो तेव्हा प्रामुख्याने नजरेत काय भरते आपल्या? सजीव आणि निर्जीव जगात आपण वावरतोय असं वाटतं ना? सजीव म्हणजे प्राणी, पक्षी, वनस्पती आणि आपण मानवसुद्धा पेशींचे बनले आहोत हे तुम्ही जाणताच. पेशी म्हणजे सजीवांचे “रचनात्मक व कार्यात्मक एकक असते.” हे तुम्हाला ठाऊक आहेच. तसंच आजच्या कॉम्पुटर व स्मार्टफोनच्या काळात तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी हाही शब्द तुम्हाला नवीन नाही. ह्या तंत्रज्ञानामुळे पेशींच्या अभ्यासात खूप विकास होऊन ‘पेशीविज्ञान’ हा स्वतंत्र विषय तयार झाला.


 

प्राण्यांचे वर्गीकरण (भाग - ४)


17 April 2021

प्राणी जगत हे दोन उपसृष्टीत विभागलेले आहे हे आपण भाग ३ मध्ये बघितलयं. कुठल्या ह्या दोन उपसृष्टी आहेत? (१) असमपृष्ठरज्जू (Non chordates) (२) समपृष्ठरज्जू (Chordates)

उपसृष्टी असमपृष्ठरज्जू मध्ये पृष्ठरज्जू (Notochord) कल्ला विदरे जीवनाच्या कुठल्याही अवस्थेत नसतात तर उपसृष्टी समपृष्ठरज्जूमध्ये नोटोकॉर्ड, कल्ला विदरे जीवनाच्या कुठल्याना कुठल्या अवस्थेत असतातच. (उदा. आपण मानवच आहोत. मानवात गर्भावस्थेत नोटोकॉर्ड व कल्लाविदरे असतात.)



 

प्राण्यांचे वर्गीकरण (भाग - ३)


8 March 2021

पृथ्वीवर असंख्य जीव अस्तित्त्वांत आहेत. ते किती आहेत? साधारण ८७ लक्ष. ह्या ८७ लक्ष सजीवांपैकी २५%च सजीवांची आपल्याला ओळख आहे. आपण सर्व प्राण्यांचा अभ्यास कसा करणार? त्यासाठी वर्गीकरण आवश्यक आहे.



 

प्राण्यांचे वर्गीकरण (भाग - २)


28 January 2021

लिनीयसने साध्या सरळ सोप्या, बाह्यगुणांच्या आधारे केलेल्या वर्गीकरणात काही कमतरता राहून गेल्या आहेत. अत्यंत सोपा वर्गीकरणाचा प्रकार असल्यामुळे आजही तो वापरला जातो. तरीही त्यात त्रुटी आहेतच.



 

प्राण्यांचे वर्गीकरण (भाग - १)


14 January 2021

बालपणापासून आपण अनेक प्राणी बघत असतो. लहानपणी आई घास भरवताना हा घास काऊ चा, हा घास चिऊ चा करून कावळा चिमणीची ओळख करून देते. नंतर कित्येक प्राण्यांची ओळख पुढच्या जीवनांत होतेच. अशी ओळख होतांना लक्षांत येतं की प्रत्येक प्राणी त्याच्या रूपाने वेगळा आहे. त्याला स्वत:ची अशी जीवनपद्धती आहे. त्याची स्वत:ची अशी वैशिष्ठ्ये आहेत. ह्यालाच जैवविविधता असे म्हणतात.



 

वनस्पतींचे वर्गीकरण


16 December 2020

मुलांनो, आपण सर्वजण पृथ्वीवर राहतो. काय काय आहे बरं पृथ्वीवर? बरोबर, डोंगर, नद्या, समुद्र इ. आहे. अरे, शिवाय आपण स्वतः नाही का? म्हणजे आपल्या सारखी माणसे आहेत, यापुढे तुम्ही लगेच सांगाल पशु -पक्षी, झाडे, झुडपे, जलचर वगैरे. हे सर्व पाहिल्यावर मला सांगा अशा सर्व गोष्टींचे दोन मुख्य भागात विभाजन करायचे म्हटले तर तुम्ही कसे कराल? जरा विचार करा. हो बरोबर, सजीव आणि निर्जीव. तुमचे उत्तर बरोबर आहे. पण तुम्ही केवढा विचार केला आहे माहित आहे?



 

आनुवंशिकता व उत्क्रांती (भाग ३)


10 October 2020

मुलांनो, आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सजीव असतात. पण पृथ्वीतलावर पहिला सजीव कोणता व कधी निर्माण झाला असेल? याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का?



 

आनुवंशिकता व उत्क्रांती (भाग २)


22 September 2020

मुलांनो, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये चेहरा, केस, उंची, त्वचेचा रंग, शरीराची ठेवण इत्यादी बाबतीत तुम्हाला काही साम्य आढळते का? तसेच तुमच्या मित्रांच्या कुटुंबातही या प्रकारचे साम्य दिसते का? दिसते ना? म्हणजे एकाच कुटुंबातील माणसे ओळखता येतात. थोडक्यात काय? त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग, उंची यासारखी शारीरिक गुणवैशिष्ट्ये तसेच आईवडिलांचे मधुमेह, दमा यासारखे आजार पुढच्या पिढीत संक्रमित होतात.



 

आनुवंशिकता व उत्क्रांती (भाग १)


16 September 2020

आपल्या घरात बाळाचा जन्म झाला की आपल्या सर्वांच्या, विशेषतः घरातल्या मोठ्या माणसांच्या मनात पहिला प्रश्न कोणता निर्माण होतो?
बरोबर! बाळ-बाळंतीण सुखरुप आहेत ना?
त्यांनतर येणारा दुसरा प्रश्न कोणता?
अगदी बरोबर. बाळ कुणासारखे दिसते?

साधारणपणे बाळाची ठेवण त्याची आई किंवा वडील यांच्यासारखी असते. त्यात कुणाला कधी-कधी बाळाच्या आजी-आजोबांचा सुद्धा भास होतो. म्हणजे बाळाचे गुण त्याच्याच घराण्यातल्या कोणाशी तरी मिळते जुळते असतात.

 

ऑक्सिजन प्लॅन्टमधील ऑक्सिजन निर्मिती


26 May 2021

ऑक्सिजन (O2) अर्थात प्राणवायु: ऑक्सिजनचा शोध कार्ल शीले ह्या स्विडीश रसायन शास्रज्ञाने सन 1772 मधे लावला. त्याने पोटॅशियम नायट्रेट मधून ऑक्सिजन वेगळा केला. आपणा सर्वांना माहित आहे की, पृथ्वीवर जगण्यासाठी सर्व जीवांना प्राणवायु आवश्यक आहे. असा हा प्राणवायु आपल्याला हवेतून मिळत असतो. हवेत मुख्यत: पुढील घटक असतात - (नायट्रोजन) - 78%, (ऑक्सिजन) - 21%, इतर - 1%.



 

आपल्या सूर्यमालेतील ग्रह


1 April 2021

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे.

सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र हे अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्शल) व नेपच्यून (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत.



The solar system is made up of celestial objects orbiting the sun.

The planets are similar to the distance from the Sun - Mercury, Venus are the inner planets, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus (Herschel) and Neptune (Varun) are the outer planets. Six of the eight planets are surrounded by natural satellites (the most commonly used word in Marathi is the moon).



 

ध्यासपर्व


18 March 2021

सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 च्या “लोकसत्तेतील” एक बातमी- “डॉ अन्वय मुळे, पाच वर्षात शंभराहून अधिक ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!”

सहजिकच मानवाला संजीवन देणा-या संशोधक डॉ. ख्रिश्चन बर्नर्डचे नाव सर्व प्रथम डोळ्यासमोर आले. ह्रदयरोपणाची मानवावरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया त्याने 3 डिसेंबर 1967 ला केली. त्या वेळी या घटनेचे वर्णन करताना “टाईम”ने त्यास मेडिकल सायन्स मधील एव्हरेस्ट शिखर जिंकल्याची उपमा दिली होती.



 

दूध एक पूर्णान्न


5 February 2021

अन्न, वस्त्र व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा! तरी जन्माला आलेल्या बालकांची पहिली गरज असते ती प्रामुख्याने अन्नाची! मग इतर गरजा. ही अन्नाची गरज भागवण्यासाठी निसर्गानेच आईच्या दुधाची व्यवस्था जन्माबरोबरच केलेली असते.



 

The Relative Size of Particles


2 January 2021

When you look around you, what do you see? The world is filled with all sorts of things. Trees, birds, people... The list goes on and on. Would you, however, believe that there are all sorts of things that you can’t see? That is true! Things like bacteria, germs ... even dust mites...


आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर काय दिसतं? सारं जग विविध गोष्टींनी भरलेलं आहे. झाडं, पक्षी, माणसं..........ही यादी तर वाढतच जाते. मग आता तुम्हाला जर असं सांगितलं की, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला न दिसणाऱ्या भरपूर वस्तू आहेत तर तुमचा विश्वास बसेल का?



 

नोबेल पारितोषिक


8 December 2020

१० डिसेंबर या दिवसाला जागतिक स्तरावर फार महत्व आहे कारण या दिवशी निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच संशोधन करणाऱ्या व्यक्तींना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले जाते. काय आहे हा नोबेल पुरस्कार? हा पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली आणि ती कोणी केली? असे काही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. चला तर मग ... या नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ या.



 

या नावांमागे दडलंय काय?


10 November 2020

'मूलद्रव्यांची आवर्तसारणी' अर्थात 'Periodic Table of Elements', या आवर्तसारणीत माहीत असलेली मूलद्रव्य त्यांच्या अणुक्रमांकानुसार मांडलेली असतात. प्रत्येक मूलद्रव्याला त्याच्या गुणधर्मानुसार जागा दिलेली असते. प्रत्येक चौकटीत मूलद्रव्याचे नाव, त्याची संज्ञा व अणुक्रमांक दिलेला असतो.

एखाद्या व्यक्तीचे किंवा पदार्थाचे नाव ही जशी त्याची ओळख असते तसेच मूलद्रव्यांचे ही आहे.



 

वस्त्रप्रावरणाची निवड व त्यांची योग्य ती देखभाल


23 October 2020

"एकनूर आदमी तो दसनूर कपडा" ही म्हण आपल्या परिचयाची आहे व आपण त्याचा अनुभव पण घेत असतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडण्यासाठी आपल्याला आपल्या वस्त्रप्रावरणाची निवड व त्यांची योग्य ती देखभाल करणे गरजेचे असते.



 

अणुशक्ती (Nuclear Power)


31 August 2020

मुलांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की आपल्याला रोज ठराविक प्रमाणात जेवावे लागते, कारण आपल्या दिनचर्येतील वेगवेगळी कामे करण्याकरिता आपल्याला जी ऊर्जा लागते ती या अन्नातून मिळते. त्याचप्रमाणे आपल्या वापरातील विविध साधने चालविण्याकरिता पण ऊर्जा लागते.

*प्रत्येक पाठात ८वी ते १०वीचा पूर्ण अभ्यासक्रम एकत्रित घेतला आहे. मुलांनी त्यांना आवश्यक तेव्हढा वाचावा.

Send us your feedback

Kiran Phatak

email: ka704phatak[at]gmail.com

Vidnyanvahini

Postal Address:

'Rangdeep' plot 20, lane 10
Natraj Housing Society
Karvenagar, Pune 411052



Send us your feedback

* Your name

* Your email

* Your location

A brief message


All diagrams, pictures, tables etc. are from websites on Internet. We are thankful to all these sources.
Vidnyanvahini is a Non-Governmental Organisation (NGO) and this entire write up is for students, teachers and general public, free of charge.
IT IS NOT FOR ANY COMMERCIAL USE.